पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले आहे का? ऑनलाइन चेक करा | Pan Card Aadhar Card Link Status Check 2025

Pan Card Aadhar Card Link Status Check

पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहेत. आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्डची लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

भारत सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

​तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी जोडले गेले आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने फक्त दोन मिनिटांत ही माहिती आपण मिळवू शकतो. या लेखाच्या माध्यमातून आपण पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?

भारत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्यापासून वाचवणे आणि आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवणे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्याने भविष्यातील अडचणी टाळता येतात. पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडल्याने होणारा मुख्य फायदा म्हणजे तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्यापासून वाचते आणि सर्व आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालू राहतात.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. बँकेत मोठा व्यवहार करताना पॅन कार्ड आवश्यक असते, परंतु पॅनकार्ड अकार्यक्षम असल्याने व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. पॅन कार्ड अकार्यक्षम झाल्यास, पुन्हा सक्रिय करण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागते.

तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ नये म्हणून दिलेल्या मुदतीमध्ये लवकरात लवकर लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे.

​✅पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले आहे का? ऑनलाइन चेक करा

​खाली दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

  • आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी,​ सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत  https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • ​वेबसाइटच्या मुख्य पेजवर तुम्हाला ‘Quick Links’ असा पर्याय दिसेल. त्यामध्ये खाली आल्यावर एक पर्याय पाहायला मिळेल “Link Aadhaar Status” या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर अचूकपणे एंटर करायाचा आहे. पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर “View Link Aadhaar Status” या पर्यायावर क्लिक करा.
  • वरील सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर पॅन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे समजेल. ​जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक केलेले असेल, तर तुम्हाला ​“Your PAN is already linked to given Aadhaar”(तुमचे पॅन दिलेल्या आधारशी आधीच लिंक आहे.)असे स्टेटस पाहायला मिळेल.
  • ​जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल, तर तुम्हाला ​“PAN not linked with Aadhaar. Please click on Link Aadhaar link to link your Aadhaar with PAN.” (पॅन कार्ड  आधार कार्डशी लिंक नाही). असे स्टेटस पाहायला मिळेल.
  • जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर त्वरित पॅन लिंक करून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आवश्यक शुल्क भरून लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी वेळेत लिंक करून घ्या. तर आपण अशा पद्धतीने आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे माहिती करून घेऊ शकतो.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या लेखामध्ये काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *